सायना नेहवालची भारतीय खुल्या बॅडमिंटन सेमिफायनलमध्ये धडक

सायना नेहवालने भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सेमिफायनलमध्ये धडक मारलीय. त्यामुळे सायनाला जागतिक चॅम्पियन बनण्याची संधी मिळणार आहे.

Updated: Mar 28, 2015, 09:28 AM IST
सायना नेहवालची भारतीय खुल्या बॅडमिंटन सेमिफायनलमध्ये धडक  title=

नवी दिल्ली : सायना नेहवालने भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सेमिफायनलमध्ये धडक मारलीय. त्यामुळे सायनाला जागतिक चॅम्पियन बनण्याची संधी मिळणार आहे.

जागतिक नंबर दोन असलेल्या सायनानं इंडोनेशियाच्या हॅना रामाधिनीवर 21-15, 21-12ने मात करत सेमीफायनलमध्ये धडक मारलीय. ऑल इंग्लड फायनल हरलेल्या सायनानं ही स्पर्धा जिंकली, तर सायनाला जागतिक चॅम्पियन बनण्याची संधी आहे. उपांत्य फेरीत सायनाची गाठ जपानच्या युई हाशिमोटोशी पडेल.  

विश्व बॅडमिंटन महासंघाने (बीडब्लूएफ) जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने एका स्थानाची झेप घेऊन टॉप फाईव्हमध्ये एंट्री केली. गेल्या महिन्यात पार पडलेल्या डेन्मार्क आणि फ्रेंच ओपन स्पध्रेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केल्याचा सायनाला फायदा झाला. या दोन्ही स्पर्धात तिला जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या चीनच्य शिजियान वांगकडून पराभव पत्करावा लागला होता. या क्रमवारीत  भारताच्या पी. व्ही. सिंधूने दहावे स्थान कायम राखले आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.