म्हणून विराट कोहली यशस्वी

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं विराट कोहलीचं तोंडभरून कौतुक केलं आहे, तसंच कोहली यशस्वी का होतोय, याचंही गुपित सचिननं सांगितलं आहे. 

Updated: May 27, 2016, 06:26 PM IST
म्हणून विराट कोहली यशस्वी title=

दुबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं विराट कोहलीचं तोंडभरून कौतुक केलं आहे, तसंच कोहली यशस्वी का होतोय, याचंही गुपित सचिननं सांगितलं आहे. तेंडुलकरनं गल्फ न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये कोहलीबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. 

विराट कोहली हा खेळताना बॅट सरळ ठेवतो, तसंच चांगले शॉट मारून तो रन बनवतो. आपला खेळ सुधरवण्यासाठी तो प्रचंड मेहनत घेतो, असं सचिन म्हणाला आहे. विराट कोहलीच्या शिस्तीचंही सचिननं कौतुक केलं आहे. कोहली हा मानसिकदृष्ट्या खूप सक्षम आहे, त्यामुळे दबाव असताना त्याचा खेळ आणखी बहरतो, अशी प्रतिक्रिया सचिननं दिली आहे. येत्या काळामध्ये विराट कोहली आणखी चांगला खेळेल आणि खेळाची उंची वाढवेल, असंही सचिन म्हणाला आहे.