कोहलीपेक्षा सचिन तेंडुलकरच अव्वल - मोहम्मद युसुफ

भारताचा कर्णधार विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असला तरी कोहलीपेक्षा सचिन तेंडुलकरच चांगला क्रिकेटर असल्याचे मत पाकिस्तानचे माजी फलंदाज मोहम्मद युसुफ यांनी व्यक्त केलेय. 

Updated: Jan 18, 2017, 10:39 AM IST
कोहलीपेक्षा सचिन तेंडुलकरच अव्वल - मोहम्मद युसुफ title=

नवी दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असला तरी कोहलीपेक्षा सचिन तेंडुलकरच चांगला क्रिकेटर असल्याचे मत पाकिस्तानचे माजी फलंदाज मोहम्मद युसुफ यांनी व्यक्त केलेय. 

मी कोहलीकडून काही हिरावून घेत नाहीये. त्याच्यात प्रतिभा आहे. मात्र मी सचिनची कामगिरी सरस आहे कारण ज्या कालावधीत तो खेळला सर्वोत्कृष्ट संघ, वेगवान गोलंदाज आणि स्पिनर्सविरोधात खेळला. 

९०च्या दशकातील तसेच २०११पर्यंत क्रिकेटमध्ये खेळाडूंचा जो स्तर होता तसा राहिलेला नाहीये. २०११च्या विश्वचषकानंतर हा स्तर कमी झालाय. सचिन अव्वल दर्जाचा खेळाडू होता आणि हे त्याच्या धावांच्या आकडेवारीवरुन दिसते, असे युसुफ म्हणाले. 

मी सचिनविरुद्ध अनेक सामने खेळला. अनेकदा सचिनने विजयी खेळी साकारल्या. मला नाही वाटत कोहलीला त्या स्तराची गोलंदाजी अथवा विरोधी संघाचा सामना करावा लागतोय.