मुंबई: क्रिकेटमधले सगळेच विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहेत. 24 वर्षांच्याआंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या कारकिर्दीत सचिनसाठी गर्वाचे, अभिमानाचे बरेच क्षण आले. यातल्या सगळ्यात जास्त गर्व झालेल्या क्षणाबद्दल सचिननं स्वत:च सांगितलं आहे.
2011च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये प्रेक्षकांनी भरलेल्या वानखेडे स्टेडियमवर राष्ट्रगीत म्हणणं हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात गर्वाचा क्षण होता, असं सचिन तेंडुलकर म्हणाला आहे.
तसंच 2003च्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या मॅच आधी झालेलं राष्ट्रगीत माझ्यासाठी वेगळा अनुभव देऊन गेला, अशी प्रतिक्रिया सचिननं दिली आहे. सेंच्युरिअन मैदानावार 60 हजार प्रेक्षकांसमोर जन गण मन म्हणतानाची भावना वेगळी असल्याचं सचिननं सांगितलं.
राष्ट्रगीताचे हे दोन्ही अनुभव मी कधीच विसरु शकत नाही, आजही तो आवाज माझ्या कानांमध्ये दुमदुमतो असं सचिन म्हणालाय.
इंटरनॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंटनं स्पोर्टस हिरोज या नावानं राष्ट्रगीताचं अनावरण केलं. सचिन तेंडुलकरच्या हस्ते राष्ट्रगीताचं अनावरण करण्यात आलं. स्पोर्ट्स हिरोज राष्ट्रगीतामध्ये सचिन तेंडुलकर, सुनिल गावस्कर, सुशिल कुमार, धनराज पिल्ले, सानिया मिर्झा, महेश भूपती, गगन नारंग, बायचुंग भुतिया या दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे.
या राष्ट्रगीताचं दिग्दर्शन अभिजीत पानसे यांनी केलं आहे. तर माजी क्रिकेटर निलेश कुलकर्णीच्या संकल्पनेतून याचं अनावरण करण्यात आलं. मुला-मुलींना खेळाकडे वळवण्याचा या संकल्पनेचा उद्देश आहे.
पाहा स्पोर्टस हिरोजचं राष्ट्रगीत
Honored to be part of @thesportsheroes. Singing the National Anthem has always been special. https://t.co/1ILCNyU72s
— sachin tendulkar (@sachin_rt) January 24, 2016