अंडर १९ वर्ल्डकप : ऋषभची शानदार सेन्चुरी; भारत सेमीफायनलमध्ये दाखल

अंडर १९ वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया आणि नामीबियामध्ये झालेल्या क्वार्टर फायनल सामना फतल्लाहमध्ये पार पडला. यामध्ये ऋषभ पंत यानं झळकावलेल्या दमदार सेन्चरीमुळे भारताला वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये दाखल व्हायची संधी मिळालीय. 

Updated: Feb 6, 2016, 05:27 PM IST
अंडर १९ वर्ल्डकप : ऋषभची शानदार सेन्चुरी; भारत सेमीफायनलमध्ये दाखल title=

नवी दिल्ली : अंडर १९ वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया आणि नामीबियामध्ये झालेल्या क्वार्टर फायनल सामना फतल्लाहमध्ये पार पडला. यामध्ये ऋषभ पंत यानं झळकावलेल्या दमदार सेन्चरीमुळे भारताला वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये दाखल व्हायची संधी मिळालीय. 

या सामन्यात, टीम इंडियानं पहिल्यांदा बॅटिंग करत ५० ओव्हर्समध्ये ६ विकेटसवर ३४९ रन्स बनवले. याचं उत्तर देताना नामीबियाची टीम ३९ ओव्हरमध्ये ऑलआऊट १५२ रन्स बनवू शकले... आणि टीम इंडियानं तब्बल १९७ रन्सनं शानदार विजय मिळवला. 

टीम इंडियाकडून मयांक डागर आणि अनमोलप्रीत सिंह यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. 

ऋषभ पंत मॅन ऑफ द मॅच

भारतानं टॉस जिंकल्यानंतर मैदानात उतरलेल्या ऋषभनं इशान किशनसोबत सुरुवात केली... पण, टीमचा स्कोअर १८ वर असताना किशन आउट झाला. त्यानंतर पंत आणि अनमोलप्रीत सिंहनं ऋषभला चांगली साथ दिली. 

ऋषभनं १४ फोर आणि २ सिक्ससहीत केवळ ८२ बॉल्समध्ये शतक झळकावलं. तो १११ रन्स बनवून आऊट झाला. ऋषभला मॅन ऑफ द मॅच म्हणून निवडण्यात आलं.