सिल्वर मेडल विजेती पी. व्ही. सिंधूवर शुभेच्छांचा वर्षाव

रिओ ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन स्पर्धेत स्पेनच्या कॅरोलिनाला जोरदार टक्कर दिली. पी. व्ही. सिंधूच्या या कामगिरीचे सर्वच स्तरातून कौतुक होत असून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Updated: Aug 19, 2016, 10:59 PM IST
सिल्वर मेडल विजेती पी. व्ही. सिंधूवर शुभेच्छांचा वर्षाव title=

मुंबई : रिओ ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधूने चांगली कामगिरी केली. तिने पहिला सेट कडवे आव्हान देत जिंकला. मात्र, काही चुकांमुळे तिला पुढच्या दोन सेटमध्ये पराभव झाला. तिने प्रथम मानांकित स्पेनच्या कॅरोलिनाला जोरदार टक्कर दिली. पी. व्ही. सिंधूच्या या कामगिरीचे सर्वच स्तरातून कौतुक होत असून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताला सुवर्ण पदकाचे स्वप्न दाखविणाऱ्या पी. व्ही. सिंधूवर पराभवानंतर देखील कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारताची ती सर्वात कमी वयाची खेळाडू आहे. यापूर्वी ऑलिम्पिकमध्ये सायनाने भारताला कांस्य पदकाची कमाई करुन दिली होती. स्पेनच्या कॅरोलिना मारिनसोबत तिने दिलेली लढत भारतीय बॅडमिंटन चाहता कधीच विसरु शकणार नाही असा आहे. पी. व्ही. सिंधूच्या रौप्य पदकाच्या कमाईचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले. सिंधूची खेळी वर्षानुवर्षे लक्षात राहील, असे पंतप्रधानांनी  ट्विटवरुन म्हटले आहे.

 

शतकांचा बादशहा आणि ऑलिम्पिकचा सदिच्छा दूत सचिनने देखील सिंधूच्या खेळाचे कौतुक केले आहे. यूवा सिंधूने आपल्या खेळाने सर्वांचे मन जिंकले. अशा शब्दात सचिनने सिंधूवर स्तूती केली.