माल्ल्यांचा रॉयल चॅलेंजर्स टीमच्या संचालकपदाचा राजीनामा

रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकपदाचा, विजय माल्ल्या यांनी राजीनामा दिला आहे.

Updated: Mar 17, 2016, 06:58 PM IST
माल्ल्यांचा रॉयल चॅलेंजर्स टीमच्या संचालकपदाचा राजीनामा title=

मुंबई : रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकपदाचा, विजय माल्ल्या यांनी राजीनामा दिला आहे. बीसीसीआयला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने ईमेलने ही माहिती दिली आहे.  रुसेल ऍडम्स यांची संचालकपदी नेमणूक करण्यात आली होती. 
 
विजय माल्ल्या यांनी देश सोडल्याच्या पाच दिवसानंतर हा मेल पाठवण्यात आला. हा मेल 7 मार्चला  पाठवण्यात आला आहे. 

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलमध्ये असणाऱ्या बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याला हा ईमेल पाठवण्यात आला आहे. 
 
विजय मल्ल्या यांनी रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकपदावरुन राजीनामा दिल्याची माहिती या मेलमध्ये देण्यात आली आहे. 

तसेच विजय माल्ल्या यांचा मुलगा सिद्दार्थ मल्ल्या बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये असेपर्यंत विजय माल्ल्या प्रमुख मार्गदर्शक असतील, अशी माहितीदेखील मेलमधून दिली आहे,  'आम्हाला रुसेल ऍडम्स जे आता आरसीबी संघाचे प्रमुख असणार आहेत, त्यांच्याकडून ईमेल मिळाला आहे.  असं बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.