स्नेहा उल्लाल क्रिस गेलची गर्लफ्रेंड?

'लकी- नो टाइम फॉर लव्ह' या चित्रपटातून सलमानची हिरोईन म्हणून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी स्नेहा उल्लाल पुन्हा एकदा चर्चेत आलीये.

Updated: Mar 17, 2016, 02:12 PM IST
स्नेहा उल्लाल क्रिस गेलची गर्लफ्रेंड? title=

मुंबई : 'लकी- नो टाइम फॉर लव्ह' या चित्रपटातून सलमानची हिरोईन म्हणून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी स्नेहा उल्लाल पुन्हा एकदा चर्चेत आलीये.

वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज क्रिस गेलसोबतच्या फोटोवरुन सोशल मीडियावर तिच्या नावाची जोरदार चर्चा होतेय. तिचा क्रिस गेलसोबतचा सेल्फी सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. 

वेस्ट इंडिजच्या सामन्याआधी झालेल्या पार्टीदरम्यान स्नेहाने गेल आणि ब्राव्होसोबत काढलेले फोटो चांगलेच ट्रेंड होतायत. पार्टीच्या रात्री क्रिस गेल क्यूट दिसत होता. त्याच्यासोबत डान्स केला. चॅट केला. तो एक कूल पर्सन आहे. असं स्नेहाने आपल्या फेसबुक पोस्टवर म्हटलंय. तसंच त्याच्यासोबतचा फोटोही शेअर केलाय. 

 

Look at @chrisgayle333 being all cute last night . We danced and chatted .Such a cool person.Best of luck for tomorrows match .#partywithsportz #westindiescricket #champion

Posted by Sneha Ullal on Monday, March 14, 2016

 

Discussing cricket,dancing and India. Game on Chris Gayle

Posted by Sneha Ullal on Wednesday, March 16, 2016