मुंबई : क्रीडा क्षेत्रात २०१५ मध्ये काही महत्त्वपूर्ण विक्रम झालेत. यात उसेन बोल्ड याचा बीजिंगमधील विश्व विक्रमी धाव, जोकोविच याचे फरफेक्ट वर्ष यांचा उल्लेख करता येईल, तर चला पाहू या कोणते असे क्षण होते
सुसाट बोल्ट पुन्हा विश्व विजेता...
जमैकाच्या उसेन बोल्ट २८ ऑगस्ट २०१५ पुन्हा एकदा सर्वात जगातला वेगवान पुरूष होण्याचा मान मिळविला आहे. बीजिंगमध्ये सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय अथॅलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत उसेन बोल्टनं निर्धारीत अंतर अवघ्या ९.७९ सेकंदात पार केलं.
त्याच्या पाठोपाठ जस्टीन गॅटलिनं दुसरा क्रमांक पटकावला. २०१३मध्ये उसेन बोल्टनंच वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली. पण त्यानंतर बोल्ट दुखापतग्रस्त होता. दुखापतीनंतरच्या पहिल्याच मोठ्या स्पर्धेत उतरताना सुरूवातीपासून बोल्टला सूर गवसला नाही.
सेमीफायनलच्या रेसमध्ये तर तो चक्क नवव्या स्थानावर होता. त्यामुळे त्याच्या फायनलमध्ये त्याच्या विजयाबद्दल साशंकता होती. पण त्याच्या चाहत्यांच्या अपेक्षांवर अगदी तंतोतंत खरा उतरणारा उसेन यंदाही विजेता ठरला.
यानंतर या ऑलिम्पिक चॅम्पियनने आपले वर्ल्ड टायटल १० केले आहेत. त्याने १०० मीटर, २०० मीटर आणि ४x१०० रिलेमध्ये गोल्ड मेडल मिळविले आहे.
तसेत त्याने २०० मीटर शर्यत १९.१९ सेकंदात पूर्ण करून आपल्या नावावर एक नवा विक्रम केला आहे.
अधिक वाचा : उसेन बोल्ट पुन्हा ठरला वेगाचा बादशाह
.........
अजिंक्य नोवाक जोकोविच
यंदा नोवाक जोकोविच याचे वर्ष खूपच चांगले गेले. त्याने एटीपी टूअर फायनलमध्ये २२ नोव्हेंबरला रॉजर फेडरर याला ६-३, ६-४ ने नमवून नंबर वन होण्याचा किताब जिंकला. त्याने सलग चार वर्ष एटीपी टूरची फायनल जिंकण्याचा विक्रम केला आहे.
त्याने या वर्षात आपल्या कारकिर्दीतील ११ किताब जिंकला आहे. त्याने सलग कोणत्याही स्पर्धेची १५ फायनल खेळण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. तसेच एकूण ८८ सामन्यात ८२ सामने आपल्या नावे करण्याचा विक्रमही त्याने केला आहे. तसेच त्याने या वर्षात १.०५ दशलक्ष अमेरिकन डॉलर जिंकले आहे.
'वर्ल्डकप'मध्ये सलग चार शतक, संघकारानं रचला इतिहास
'वर्ल्डकप २०१५' मध्ये श्रीलंका आणि स्कॉटलंड सामन्यात ११ मार्च २०१५ रोजी श्रीलंकेचा बॅटसमन कुमार संघकारा यानं सचिनला करता आला नाही असा रेकॉर्ड करून दाखवलाय. स्कॉटलंड विरूद्ध १२४ धावांची खेळी करून सलग चार वर्ल्ड कप सामन्यात शतक झळकावणारा पहिला बॅट्समन ठरला आहे.
कुमार संघकारा आणि तिलकरत्न दिलशान यांनी शतक ठोकलंय. महत्त्वाचं म्हणजे, एकाच वर्ल्डकपमध्ये सलग चार मॅचेसमध्ये शतक ठोकरणारा कुमार संघकारा पहिला वहिला बॅटसमन ठरलाय.
दिलशान ९९ बॉल्समध्ये १०४ रन्स करून बाद झाला. या शानदार खेळात त्यानं १० फोर आणि एक सिक्सरही ठोकला. दिलशाननं ९७ बॉल्समध्ये शतक ठोकलं.
तर संघकारानं ८६ बॉल्समध्येच आपलं शतक पूर्ण केलं. त्यानं आपल्या शतकीय खेळीत आठ फोर आणि तीन सिक्सर ठोकले. संघकारानं वनडे क्रिकेटमध्ये आपली २५ वी सेन्चुरी पूर्ण केलीय.
वर्ल्डकप २०१५ मध्ये संघकाराचे शानदार शतक
बांग्लादेशविरुद्ध १०५* रन्स
इंग्लंडविरुद्ध ११७* रन्स
ऑस्ट्रेलियाविरुद्ध १०४ रन्स
स्कॉटलंड १२४ रन्स
अधिक वाचा : सचिनलाही जमले नाही ते केले संगकाराने
.....................
सुपरमॅन डिव्हिलिअर्सने बनवला जलद ५०, १०० धावांचा वन डे विक्रम
डिव्हिलअर्सने वन डेमध्ये सर्वात जलद अर्धशतक आणि शतक बनविण्याचा विक्रम चोडला. त्याने १६ चेंडूत अर्धशतक बनविले.
३९ व्या षटकात चौथ्या चेंडूवर मैदानात उतरलेल्या डिविलिअर्सने चौकारासह खेळीची सुरूवात केली. ३१ चेंडूत ८ चौकार आणि १६ षटकारांसह सेंच्युरी पूर्ण केली.
यापूर्वी सर्वात जलद सेंच्युरीचा विक्रम न्यूझीलंडच्या कोरी अँडरसन यांच्या नावावर होता. त्याने २०१४मध्ये वेस्ट इंडिज विरूद्ध ३६ चेंडूत सेंच्युरी केली होती. डिव्हिलअर्सने त्याच्यापेक्षा पाच चेंडू कमी खेळले.
अँडरसनने दोन दशक जुना पाकिस्तानी खेळाडू शाहिद आफ्रिदीचा रेकॉर्ड तोडला. आफ्रिदीने ३७ चेंडूत सेंच्युरी बनवली होती. डिव्हिलअर्सने त्याच्यापेक्षा ६ चेंडू कमी खेळले.