VIDEO : रविंद्र जडेजाची तलवारबाजी

नेहमी आपल्या बॅटनं प्रतिस्पर्ध्यांची धोबीपछाड करणा-या रविंद्र जाडेजाचं वेगळं रुप आज त्याच्या चाहत्यांना पहायला मिळालं. प्रेयसी रिवा सोळंकीच्या लग्नगाठीत आज जडेजा अडकणार आहे. 

Updated: Apr 17, 2016, 12:02 PM IST
VIDEO : रविंद्र जडेजाची तलवारबाजी title=

राजकोट : नेहमी आपल्या बॅटनं प्रतिस्पर्ध्यांची धोबीपछाड करणा-या रविंद्र जाडेजाचं वेगळं रुप आज त्याच्या चाहत्यांना पहायला मिळालं. प्रेयसी रिवा सोळंकीच्या लग्नगाठीत आज जडेजा अडकणार आहे. 

राजकोटमध्ये रविंद्र जाडेजा आणि रिवाचा विवाहसोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यापूर्वी पार पडलेल्या संगीत समारंभात जाडेजाच्या तलवारबाजीनं सर्वांना थक्क केलं. 

राजकोटच्या रस्त्यावरुन व-हाडी वाजत गाजत निघाले, फटाक्यांची आतशबाजी झाली आणि संगिताच्या तालावर जाडेजानं आपलं तलवरबाजीचं कसब दाखवलं.. जाडेजाच्या तलवारबाजीनं या सोहळ्याला अनोखी रंगत आली. या सोहळ्यात दौलतजादाही पहायाला मिळाली.