मुंबई : टीम इंडियाचे संचालक म्हणून चांगली कामगिरी पार पाडल्यानंतरही, रवी शास्त्री यांची टीमच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली नाही. निवड न झाल्याने रवी शास्त्री नाराज आहेत असं दिसतंय, निवड न झाल्याने आपण निराश झालो होतो, असं त्यांनी एका इंग्रजी दैनिकाशी बोलताना म्हटलंय.
रवी शास्त्री बँकॉकमधून सुट्या घालवून परतले आहेत, यानंतर त्यांच्याशी टाईम्स ऑफ इंडियाने बातचीत केलीय. मी निराश झालो होतो, निवड न झाल्याने, पण ती निराशा त्या दिवसापुरतीच होती, आता मी पुढचा विचार करणार असल्याचं रवी शास्त्री यांनी म्हटलं आहे.
तुमची मुलाखत सुरु होती, तेव्हा गांगुली मध्येच का उठून गेला ? तुमच्यामध्ये काय मतभेद आहेत का? असे रवी शास्त्रीला विचारले असता, रवी शास्त्री म्हणाला, तुम्ही गांगुलीलाच विचार त्याला माझ्या पासून काय प्रॉब्लेम आहे.
त्रिसदस्यीय समितीने मागच्या आठवडयात अनिल कुंबळे यांच्या नावावर पसंती दिली होती, या समितीत सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर यांचा समावेश आहे. त्यामुळे अठरा महिने संघ संचालक म्हणून संघासोबत असलेल्या रवी शास्त्री यांची मुख्य प्रशिक्षकपदाची संधी हुकली. ते प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत प्रमुख दावेदार होते.
अखेर रवी शास्त्री यावर म्हणाले, गोलंदाजीत सातत्य आवश्यक असून अनिल कुंबळे गोलंदाजांना मदत करतोय. गोलंदाजीत सुधारणा आवश्यक आहेत, माझ्या कार्यकाळात संघाने चांगली कामगिरी केली. मला याचा कुठलाही खेद नाही, असे शास्त्री यांनी सांगितले.