मुंबई : बांगलादेश दौऱ्यासाठी टीम इंडियाचे हंगामी प्रशिक्षक म्हणून बीसीसीआयने केलेली शास्त्री यांची निवड योग्य असल्याचे विराट कोहलीने म्हटले आहे. माजी क्रिकेटपटू रवि शास्त्री यांची उपस्थिती संघासाठी नेहमी प्रेरणादायी ठरत असल्याचेही विराट कोहलीने म्हटले आहे.
रवि शास्त्री संघात आत्मविश्वास निर्माण करून देणारे व्यक्तीमत्व आहे, ते कधीही कोणत्याही जबाबदारीपासून पळ काढत नाहीत.
संघाला पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टीने त्यांचे नेहमी प्रयत्न सुरू असतात. त्यांनी आपले विचार कधीच दुभागू दिले नाहीत. त्यामुळे युवा खेळाडूंच्या संघाला अशा व्यक्तीची उपस्थिती असणे नक्कीच फायद्याचे ठरते, असे विराट म्हणाला.
बीसीसीआयने टीम इंडियाच्या १० जूनपासून सुरू होणाऱया बांगलादेश दौऱयासाठी रवि शास्त्री यांची हंगामी प्रशिक्षक म्हणून निवड केली आहे. याआधी ऑस्ट्रेलिया मालिका आणि विश्वचषक स्पर्धेवेळी रवि शास्त्री यांनी भारतीय संघाच्या संचालकाची धुरा यशस्वीरित्या सांभाळली होती.
ऑस्ट्रेलिया दौऱयात शास्त्री यांचे अनेक सल्ले संघासाठी आणि वैयक्तिकरित्या माझ्यासाठी देखील भरपूर फायद्याचे ठरले असल्याचेही कोहली म्हणाला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.