मुंबई : ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर फिल ह्युजच्या निधनाला अजून आठवडाही उलटला नाही तोवरच आणखी एका क्रिकेटरनं मैदानातच मृत्यू झाल्याची घटना घडलीय.
मुंबईच्या ओव्हल मैदानावर अवघ्या तेहत्तीस वर्षांच्या रत्नाकर मोरे या उभरत्या क्रिकेटरचा मृत्यू झालाय. ओव्हल मैदानावर टाटा उद्योगसमूहातील कंपन्यांचे आंतरविभागीय सामन्यांदरम्यान ट्रॉम्बे विभागाचा सामना सुरू असतानाच रत्नाकरचं निधन झालंय.
रत्नाकर मोरे ओव्हल मैदानात टाटा स्पोर्टस क्लबच्या इंटर डिपार्टमेंटल स्पर्धेत खेळत होता. सकाळी यष्टीरक्षक म्हणून मैदानात उतरलेल्या रत्नाकरला खेळ सुरू झाल्यानंतर काही वेळात अस्वस्थ वाटू लागलं होतं.
हा सामना सुरु असतानाच रत्नाकरला हृदय विकाराचा तीव्र झटका आला आणि तो तंबूतच कोसळला. त्याला तातडीनं बॉम्बे हॉस्पीटल आणि मग जीटी हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आलं. पण, एव्हाना रत्नाकरची प्राणज्योत मालवली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.