रमेश पवारनं स्पर्धात्मक क्रिकेटमधून जाहीर केली निवृत्ती

भारतीय टीमचा माजी ऑफ स्पिनर रमेश पवार यानं मंगळवारी स्पर्धात्मक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलीय. 

Updated: Nov 10, 2015, 09:39 PM IST
रमेश पवारनं स्पर्धात्मक क्रिकेटमधून जाहीर केली निवृत्ती title=

मुंबई : भारतीय टीमचा माजी ऑफ स्पिनर रमेश पवार यानं मंगळवारी स्पर्धात्मक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलीय. 

३७ वर्षीय रमेश पवारनं भारतीय टीमसाठी २ टेस्ट मॅच आणि ३१ वन डे मॅच खेळल्यात. गेली १५ वर्ष रमेशनं घरगुती क्रिकेट सामन्यात आपला सहभाग नोंदवलाय. 

अधिक वाचा - सुरेश रैनाला बीसीसीआयचा जोरदार धक्का

टेस्ट मॅचमध्ये त्याच्या नावावर ६ विकेटसं आहेत. या दोन्ही टेस्ट त्यानं बांग्लादेश विरुद्ध खेळल्या होत्या. तर वन डे मध्ये रमेशच्या नावावर ३४ विकेटसची नोंद आहे. मुंबईसाठी खेळताना रमेशनं तब्बल ४४२ विकेटस् घेतल्यात. 

अधिक वाचा - डिसेंबर महिन्यात भारत-पाक सीरिजसाठी बीसीसीआय तयार, पण...

रमेश आणि लेग स्पिनर साईराज बहुतुले यांच्या जोडीनं मुंबईला अनेक रणजी मॅचमध्ये विजय मिळवून दिलाय. परंतु, फिटनेस आणि वजनासंबंधीच्या समस्यांमुले रमेशला भारतीय टीममध्ये आपली जागा निश्चित करताना जड गेलं. 

अधिक वाचा - IPL मधील टीम घेण्याची धोनीची इच्छा?

आपल्या करिअरच्या शेवटी-शेवटी तो गुजरात आणि राजस्थानकडूनही क्रिकेट खेळला. तसंच आयपीएलमध्ये तो किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळत होता. 

मी खूप प्रामाणिकपणे क्रिकेट खेळलोय... कोणत्या ना कोणत्या प्रकारे मी या खेळाशी निगडीत राहीन... असं सांगताना पवारनं आपण मास्टर चॅम्पियन लीगमध्ये खेळणार असल्याचंही स्पष्ट केलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.