राजीव शुक्ला पुन्हा IPL अध्यक्ष, तर गांगुली सदस्य

राजीव शुक्ला यांची पुन्हा आयपीएल संचालन परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यामुळं महिनाभरापासून आयपीएल संचालन परिषदेच्या अध्यक्षपदाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे.

Updated: Apr 7, 2015, 08:29 AM IST
राजीव शुक्ला पुन्हा IPL अध्यक्ष, तर गांगुली सदस्य title=

नवी दिल्ली : राजीव शुक्ला यांची पुन्हा आयपीएल संचालन परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यामुळं महिनाभरापासून आयपीएल संचालन परिषदेच्या अध्यक्षपदाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे.

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे नेते असलेले शुक्ला २०१३ पर्यंत आयपीएलचे अध्यक्ष होते. पण आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. आयपीएलच्या अध्यक्षपदासाठी माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली, अजय शिर्के आणि रंजीब बिस्वाल यांच्यासह अनेकांची नावे चर्चेत होती, पण अखेर शुक्ला यांच्या नावाला सर्वांची पसंती मिळाली. 

कोलकातामध्ये आयपीएलच्या आठव्या पर्वाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या एक दिवसापूर्वी शुक्ला यांची नियुक्ती झाली. भारताचा माजी कॅप्टन अनिल कुंबळेला तांत्रिक समितीच्या अध्यक्षपदी कायम ठेवण्यात आलंय, तर काँग्रेसचे नेते आणि एमपीसीएचे प्रमुख ज्योतिरादित्य शिंदे वित्त समितीचे प्रमुख असतील. 

गोव्याचे चेतन देसाई विपणन समितीच्या प्रमुखपदाची जबाबदारी सांभाळणार असून, आंध्रचे गोकाराजू गंगराजू यांच्याकडे दौरा आणि कार्यक्रम समितीचं प्रभारीपद सोपवण्यात आलंय. 

बंगाल क्रिकेट संघटनेचे कोषाध्यक्ष विश्वरूप डे मीडिया समितीचे नवे प्रमुख असतील. अनुराग ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली एफिलेशन समिती नावाची नवी समिती स्थापन करण्यात आली असून, बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया आता स्वत: संविधान समिक्षण समितीचे अध्यक्षपद सांभाळणार आहेत. शुक्ला त्यांना सहकार्य करतील. भ्रष्टाचारविरोधी आणि सुरक्षा समितीच्या उपसमितीची निवड सध्या टाळण्यात आली आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.