राजस्थान रॉयलच्या खेळाडूला स्पॉट फिक्सिंगची ऑफर

आयपीएलवर पुन्हा एकदा फिक्सिंगचं सावट निर्माण झालं आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार राजस्थान रॉयलच्या एका खेळाडूनं बीसीसीआयच्या अॅंटी करप्शन युनिटकडे फिक्सिंगसाठी ऑफर मिळाल्याची तक्रार केली आहे. 

Updated: Apr 10, 2015, 01:48 PM IST
राजस्थान रॉयलच्या खेळाडूला स्पॉट फिक्सिंगची ऑफर title=

नवी दिल्ली : आयपीएलवर पुन्हा एकदा फिक्सिंगचं सावट निर्माण झालं आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार राजस्थान रॉयलच्या एका खेळाडूनं बीसीसीआयच्या अॅंटी करप्शन युनिटकडे फिक्सिंगसाठी ऑफर मिळाल्याची तक्रार केली आहे. 

रणजीमध्ये खेळणाऱ्या एका खेळाडूनं राजस्थान रॉयलच्या खेळाडूला ही ऑफर दिली असून, ऑफर दिलेला खेळाडू आयपीएलमध्ये खेळत नसल्याचंही समोर आलं आहे. सुरूवातीला आपली मस्करी होत आहे, असं या खेळाडूला वाटलं. मात्र नंतर पैशांची ऑफर मिळाल्यानंतर विषया गंभीर असल्याचं या खेळाडूच्या लक्षात आल्यानंतर रायस्थानच्या या खेळाडूनं ही ऑफर धुडकावून याबद्दल तक्रारही केली आहे.

या घटनेमुळं पुन्हा एकदा आयपीएल २०१३च्या फिक्सिंगच्या घटना ताज्या झाल्या आहेत. त्यावेळी राजस्थानच्याच तीन खेळाडूंची नावं समोर आली होती.   

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.