मुंबई : गोपालन क्रिकेट चॅलेंज कपमध्ये आपल्या शाळेच्या टीमकडून खेळतांना, राहुल द्रविडचा नऊ वर्षाचा मुलगा समितने ७७ रन्स केले. स्मितने या जोरावर अंडर १२ सामन्यात आपल्या टीमला विजय मिळवून दिला.
माल्य आदिती इंटरनॅशनल स्कूलचा टॉप स्कोरर जोहाननसोबत समितने बॅटिंग करत ७७ धावा केल्या आणि न्यू हॉरिजन पब्लिक स्कूलला चांगल्या स्थितीत येण्याची संधीच दिली नाही.
समितने जोहाननसोबत १६ षटकांत २१० रन्सची पार्टनरशीप केली आणि विरोधी टीमची जिंकण्याची संधी घालवली. कारण विरोधी टीम फक्त ९६ धावा करू शकली, माल्य आदिती टीमने ११४ रन्सच्या मोठ्या अंतराने हा सामना जिंकला.
या दरम्यान राहुल द्रविडचा मोठा मुलगा आणि छोटा मुलगा अन्वये आयपीएल दरम्यान काही मोठ्या खेळाडूंकडून टीप्स घेतांना दिसला होता, ज्यात एक ऑस्ट्रेलियन कॅप्टन स्टीवन देखील होता, राजस्थान रायल्स टीमचे मेंटोर राहुल द्रविडचे दोन्ही मुलं मैदानावर यापूर्वी दिसले आहेत.
समित या महिन्यात दहा महिन्याचा होणार आहे, जर तो पुढील काही दिवसात उत्तम खेळ करेल, तर काही वर्षांनी त्याच्या बाबाप्रमाणे त्यालाही टीम इंडियात स्थान मिळू शकतं, राहुल द्रविड वर्ल्ड कप क्रिकेटच्या मोठ्या दिग्गजांमध्ये आहेत. राहुल द्रविडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २४ हजारपेक्षा जास्त रन्स केले, त्यात ४८ शतकांचा समावेश आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.