राहुल द्रविडचा डॉक्टरेट पदवी स्वीकारण्यास इन्कार

भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार राहुल द्रविड यांनी बंगळुरु विद्यापीठाचे मानद डॉक्टरेट पदवी स्वीकारण्यास इन्कार केलाय. त्यांने सांगितले, मी मेहनत करुन पदवी प्राप्त करीन.

Updated: Jan 26, 2017, 10:28 AM IST
राहुल द्रविडचा डॉक्टरेट पदवी स्वीकारण्यास इन्कार title=

बंगळुरु : भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार राहुल द्रविड यांनी बंगळुरु विद्यापीठाचे मानद डॉक्टरेट पदवी स्वीकारण्यास इन्कार केलाय. त्यांने सांगितले, मी मेहनत करुन पदवी प्राप्त करीन.

राहुल द्रविडने बंगळुरुमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले आहे. 27 जानेवारीला विद्यापीठ आपले 52 वे वार्षिक संम्मेलन साजरे करत आहे. यावेळी विद्यापीठाने राहुल द्रविडचा गौरव करण्याचा निर्धार केला. यावेळी त्याला डॉक्टरेट पदवी बहाल करण्याचा मानस व्यक्त केला.

विद्यापाठाचे कुलपती बी. थिमे गौडा यांनी राहुल द्रविडला मानद उपाधी देण्याचा विचाराबाबत बंगळुरु विद्यापीठाचे आभार मानले होते.