मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान मोहालीत खेळला गेला. या सामन्यात भारताचा स्टार स्पिनर बॉलर आर अश्विन याने टी २० सामन्यात विकेट घेण्याचं अर्धशतक पूर्ण केलं आहे.
ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज बॉलर वॉर्नरला बाद केल्यानंतर आंतरराष्ट्रीय टी २० सामन्यात ५० विकेट घेण्याचा रेकॉर्ड अश्विनने केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टी२० सामन्यात जास्त विकेट घेणार अश्विन भारताचे पहिला तर जगातील बारावा बॉलर ठरला आहे.
अश्विनने या सामन्याआधी ४१ सामन्यात ४१ डावात २१.५५ च्या अॅव्हरेजने ४९ विकेट घेतल्या. अश्विनचं आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण झिम्बाब्वेविरोधात १२ जून २०१० रोजी झालं होतं.