१३९ वर्षात क्रिकेटच्या इतिहासात हा रेकॉर्ड करणारा अश्विन तिसरा क्रिकेटपटू

भारताचा अव्वल स्पिनर रविचंद्रन अश्विनच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात एक डाव आणि ९२ धावांनी विजय मिळवला. 

Updated: Jul 25, 2016, 11:21 AM IST
१३९ वर्षात क्रिकेटच्या इतिहासात हा रेकॉर्ड करणारा अश्विन तिसरा क्रिकेटपटू title=

मुंबई : भारताचा अव्वल स्पिनर रविचंद्रन अश्विनच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात एक डाव आणि ९२ धावांनी विजय मिळवला. 

हा विजय मिळवत टीम इंडियाने आशिया खंडाबाहेरील देशांत मोठा विजय मिळवण्याचा रेकॉर्ड केलाय. त्याचप्रमाणे या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अश्विनच्या नावेही एका रेकॉर्डची नोंद झालीये.

एकाच कसोटी सामन्यात शतक आणि सात विकेट मिळवणारा अश्विन जगातील तिसरा क्रिकेटपटू ठरलाय. १३९ वर्षात क्रिकेट इतिहासात अशी कामगिरी करणारा तो तिसरा क्रिकेटपटू आहे. 

यात १९२१मध्ये ऑस्ट्रेलियाच्या जॅक ग्रॉगरी यांनी हा रेकॉर्ड केला होता. त्यानंतर इंग्लंडचा दिग्गज क्रिकेटपटू इयान बॉथमने १९७८ आणि १९८०मध्ये दोन वेळा हा रेकॉर्ड केला होता. त्यानंतर ३६ वर्षानंतर अश्विनला ही किमया साधता आलीये.