नवी दिल्ली : आयपीएल - ६ मध्ये बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा जावई चेन्नई सुपरकिंग्जचा टीम प्रिन्सिपल गुरूनाथ मयप्पन आणि राजस्थान रॉयल्सचा मालक राज कुंद्रा यांनी सट्टेबाजी केल्या प्रकरणी सर्वौच्च न्यायालयानं दोषी ठरवलं होतं. त्यावरून शिक्षा निश्चित करण्यासाठी लोढा कमिटी गठित आली होती. या समितीचा निकाल आज सर्वोच्च न्यायालयात येणार आहे. तसेच, चेन्नई सुपरकिंग्स आणि राजस्थान रॉयल्सच्या भवितव्याचा फैसलाही समिती आज सुनावणार आहे.
सुप्रिम कोर्टानं २२ जानेवारी २०१५ रोजी मयप्पन आणि कुंद्राच्या विरोधात आरोप सिद्ध झाल्याचे सांगून शिक्षा निर्धारित करण्यासाठी सेवानिवृत्त न्यायधीशांची तीन सदस्यांची समिती नेमली होती. जस्टिस अशोक भान आणि जस्टिस आर व्ही. रवींद्रन या समितीचे सदस्य आहेत.
समिती का... ?
- या दोघांना काय शिक्षा दिली जावी तसंच राजस्थान आणि चेन्नईच्या टीमवर काय कारवाई केली जावी हे ठरवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं जस्टिस लोढा यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली होती.
- लोढा समिती दोन्ही टीम्सवर बंदी घालू शकते किंवा दोन्ही संघांना मोठा आर्थिक दंड ठोठावला जाऊ शकतो.
स्पॉट फिक्सिंगचा हा सगळा प्रकार आयपीएल सीजन -६ शी जोडला गेला आहे. जेंव्हा दिल्ली पोलिसांनी मुंबई येथून माजी टेस्ट क्रिकेटर श्रीसंत यासह राजस्थान रॉयल्सच्या ३ खेळाडुंना अटक केली.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार या तारखेला स्पाँट फिक्सिंग झाले...
- २०१३ मध्ये मुंबईत झालेल्या राजस्थान रॉयल्स विरूद्ध मुंबई इंडियन्स
- ५ मे रोजी जयपूर येथे झालेल्या राजस्थान रॉयल्स विरूद्ध पुणे वॉरिअर्स
- ९ मे रोजी मोहाली येथे झालेल्या राजस्थान रॉयल्स विरूद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब या सामन्यांमध्ये स्पॉट फिक्सिंग झाली होती.
दिल्ली पोलिसांनी ३ खेळाडुंसह ११ सट्टेबाजांना अटक केली होती. त्यानंतर क्रिकेट टीमचे मालकच यात सहभाग असल्याची माहिती पुढे आली. माजी बीसीसीआई अध्यक्ष एन. श्रीनिवासन चे जावई गुरुनाथ मयप्पन याला अटक झाली. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी एकूण ४२ लोकांना चार्जशीटमध्ये आरोपी बनवलं. त्यापैंकी ६ जण फरार आहेत. २३ मे रोजी या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली आहे.
क्रिकेट टीम मालक आणि खेळाडू याशिवाय अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील हेसुद्धा स्पॉट फिक्सिंग प्रकरणी आरोपी आहेत. लोढा समितीचा निकाल क्रिकेट विश्वासाठी धक्कादायक असेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.