75 व्या वर्षी पेले अडकला विवाहबंधनात

फूटबॉलमधला जगज्जेता महान खेळाडू पेलेचं लग्न झालं आहे.

Updated: Jul 10, 2016, 07:43 PM IST
75 व्या वर्षी पेले अडकला विवाहबंधनात  title=

साओ पावलो : फूटबॉलमधला जगज्जेता महान खेळाडू पेलेचं लग्न झालं आहे. वयाच्या 75 व्या वर्षी पेलेनं त्याची गर्लफ्रेंड मार्सिया सिबेले आओकीबरोबर लग्न केलं. मार्सिया ही पेलेपेक्षा 33 वर्षांनी लहान आहे. पेलेचं हे तिसरं लग्न आहे. 

अत्यंत साध्या पद्धतीनं पेले आणि मार्सियाचं लग्न झालं. रोसमेरी चोलबी ही पेलेची पहिली बायको आहे, तर अभिनेत्री एसिरीया नासीमेंटो त्याची दुसरी बायको आहे. पहिल्या बायकोपासून पेलेला तीन मुलं आणि दुसऱ्या बायकोपासून दोन मुलं आहेत. 

पेलेनं फूटबॉलच्या एकूण 1363 मॅच खेळल्या. या मॅचमध्ये पेलेनं 1281 गोल केले, यातले 91 गोल पेलेनं ब्राझीलकडून खेळताना केले आहेत.