पाकिस्तानची महिला खेळाडू आहे विराटची चाहती

भारत आणि पाकिस्तान मॅच म्हणजे अख्या जगाचा आकर्षणाचा विषय

Updated: Feb 27, 2016, 05:55 PM IST
पाकिस्तानची महिला खेळाडू आहे विराटची चाहती title=

मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये होणारी मॅच ही अख्या जगाचं आकर्षणाचा विषय असते. २ प्रतिस्पर्धी हे एकमेकांसमोर जेव्हा उभे ठाकतात तेव्हा प्रत्येक क्रिकेट चाहता प्रत्येक बॉल हा अगदी नजर लावून पाहत असतो.

भारताचा धुरंदर खेळाडू विराट कोहली याने अख्या जगाला त्याच्या खेळाची नोंद घेण्यास भाग पाडलं आहे. आज विराटवर कौतूकांचा वर्षाव होतोय फक्त भारतातच नाही विदेशातही त्याचे अनेक चाहते आहे. मग ते पाकिस्तान ता असेना.

पाकिस्तानात देखील विराटची एक चाहती आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ती पाकिस्तानची महिला क्रिकेटर आहे. पाकिस्तानातील अनेक महिला खेळाडू या आफ्रिदीला फॉलो करतात पण बिस्माह मारुफ ही महिला खेळाडू विराट कोहलीला फॉलो करते. 

बिस्माह मारुफ ही महिला खेळाडू म्हणते की, माझी बॅटींग स्टाईल नैसर्गिक आहे. पण मी विराट कोहलीशी अधिक प्रभावित आहे. मी त्याच्या बॅटींगची जबरदस्त फॅन आहे. मी विराट कोहली, सुरेश रैना आणि माईकल क्लार्क यांना बघून शिकतेय. 

विराटवर सगळ्यांच्या अधिक नजरा असणार आहे कारण विराटने सर्वात अधिक रन्स हे पाकिस्तान विरोधातच केले आहेत.