धोनीच्या हातात तस्कीन अहमदचे शीर असलेला फोटो व्हायरल

आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशला आठ विकेटनी धूळ चारत सहाव्यांदा आशिया कपवर नाव कोरले.

Updated: Mar 7, 2016, 08:52 AM IST
धोनीच्या हातात तस्कीन अहमदचे शीर असलेला फोटो व्हायरल title=

मिरपूर : आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशला आठ विकेटनी धूळ चारत सहाव्यांदा आशिया कपवर नाव कोरले.

 

अंतिम फेरीत बांगलादेशचा संघ पोहोचल्यानंतर बांगलादेशीच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. टीम इंडियाला डिवचण्यासाठी बांगलादेश क्रिकेटप्रेमींनी अत्यंत हीन पद्धतीन अंतिम फेरीत पोहोचल्याचा आनंद साजरा केला होता. 

बांगलादेशचा गोलंदाज तस्कीन अहमद याच्या हातात भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे शिर असल्याचे चित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. फोटोशॉपमध्ये हा फोटो तयार करण्यात आला होता. बांगलादेशच्या चाहत्यांच्या या किळसवाण्या प्रकारानंतर भारताने कडाडून यावर टीका केली होती. 

त्यानंतर आता आशिया कपच्या फायनलमध्ये बांगलादेशला हरवल्यानंतर एमएस धोनीच्या हातात तस्कीन अहमदचे शीर असलेला फोटो व्हायरल होतोय. याद्वारे भारतीय चाहत्यांनी बांगलादेशच्या क्रिकेटप्रेमींना प्रत्युत्तर दिल्यासारखे आहे.