नवी दिल्ली : पत्नीसोबत शेअर केलेल्या फोटोवरून क्रिकेटपटू मोहम्मद शमीवर काही कट्टरपंथीयांनी जोरादर टीका केली होती. या टीकेला शमीनं चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ती माझी पत्नी आहे. काय करायचं आणि काय करायचं नाही हे मला चांगलं माहिती आहे. प्रत्येकानं स्वत:च्या मनाला विचारावं आपण किती चांगले आहोत, असं ट्विट शमीनं केलं आहे.
याबरोबरच शमीनं शायरी करूनही टीकाकारांचं तोंड बंद केलं आहे. हर किसी को जिंदगी मे मुकाम नही मिलता, कुछ किस्मत वाले ही होते है जिन्हे ये नसीब होता है. जलते रहो, असं शमी म्हणाला आहे.
Very good morning
Har kisi ko jindagi mai mukam ni milta, kuch kismat wale hi hote hai jinhe ye nasib hota hai.!.jalteee rahooooo...— Mohammed Shami (@MdShami11) December 26, 2016
Ye dono meri zindage or life partner hai me acha trha janta hu kiya karna hai kiya nahi.hame apne andar dekhna chahiye ham kitna accha hai.
— Mohammed Shami (@MdShami11) December 26, 2016
पत्नीसोबतचे फोटो ट्विटरवर अपलोड केल्यानंतर शमीवर अत्यंत खालच्या शब्दांमध्ये टीका करण्यात आली होती. असा फोटा शेअर करताना काहीस कसे वाटले नाही, शमी आणि त्याच्या पत्नीला लाज वाटली पाहिजे, अशा प्रतिक्रिया अनेकांनी दिल्यात. तर धर्माची इज्जत राखावी आणि अशा प्रकारचा कोणताही फोटो शेअर करू नये, असा सल्लाही अनेकांनी दिला होता.
Beautiful moments pic.twitter.com/IHzOek43hG
— Mohammed Shami (@MdShami11) December 25, 2016