मोहम्मद कैफला जेव्हा मिळाली मोठी जबाबदारी

अंडर-19 विश्वकप 2000 मध्ये पहिल्यांदा आपली ओळख बनवणाऱ्या भारतीय टीमचा माजी क्रिकेटपटू आणि उत्तर प्रदेशचा कर्णधारपद भुषवणाऱ्या मोहम्मद कैफने रणजीमध्ये छत्तीसगडचा हात पकडला आहे.

Updated: Sep 3, 2016, 12:50 PM IST
मोहम्मद कैफला जेव्हा मिळाली मोठी जबाबदारी title=

मुंबई : अंडर-19 विश्वकप 2000 मध्ये पहिल्यांदा आपली ओळख बनवणाऱ्या भारतीय टीमचा माजी क्रिकेटपटू आणि उत्तर प्रदेशचा कर्णधारपद भुषवणाऱ्या मोहम्मद कैफने रणजीमध्ये छत्तीसगडचा हात पकडला आहे.

उत्तरप्रदेश हा दिग्गज खेळाडू आता छत्तीसगडचं कर्णधारपद भुषवणार आहे. ही टीम पहिल्यांदाच रणजी टूर्नामेंटमध्ये पदार्पण करणार आहे.

छत्तीसगड क्रिकेट संघाच्या अधिकाऱ्यांसोबत आणि कोच सुलक्षण कुलकर्णी यांच्यासोबतचे फोटो त्यांनी ट्विटवर शेअर केले आहे. 

कैफ आणि युवराजची जोडी टीम इंडियाची उत्कृष्ठ जोडींमध्ये एक आहे. बॅटींग आणि फिल्डिंग ही दोघांची खासियत आहे. 2003 मधील नेटवेस्ट सीरीजच्या फायनलमध्ये या दोघांनी एक चांगली खेळी केली होती. जी नंतर अनेकांच्या लक्षात राहिली.