अॅडलेड : दिवंगत ऑस्ट्रेलियन खेळाडू फिल ह्युजेस याला श्रद्धांजली देताना ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीमध्ये राष्ट्रीय संघात १३ वा खेळाडू म्हणून स्थान दिले आहे. तसेच त्याला विविध माध्यमातून श्रद्धांजली देण्यात येणार असल्याचेही वचन दिले आहे.
ह्युजेस गेल्या महिन्यात स्थानिक क्रिकेट सामना खेळताना बॉऊन्सर लागून मृत्यू झाला होता.
ह्युजेसची आठवण म्हणून ऑस्ट्रेलिया आपल्या शर्टावर त्याचा कॅप क्रमांक ४०८ लावणार आहे. तसेच त्याचा अखेरचा स्कोअर नाबाद ६३ संदर्भातही श्रद्धांजली देण्यात येणार आहे.
ऑस्ट्रेलियाचे गव्हर्नर जनरल सर पीटर कोसग्रोवने क्लार्कला चांगल्या नेतृत्वात हिम्मत राखण्यासाठी संघाचे कौतुक केले आहे.
ऑस्टेलियाचा अभिनेता जॅक थाम्पसन यावेळी एक व्हिडिओ संदेशात कविता '६३ नॉट ऑऊट' वाचणार आहे. ही कविता क्रिकेट डॉट क़ॉम एयूचे उप समाचार संपादक एडम बर्नेट यांनी लिहिले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.