पुस्तकातून वगळणार शारापोव्हाचा धडा

रशियाची टेनिससुंदरी मारिया शारापोव्हाचा धडा पाठ्य पुस्तकातून वगळला जाणार आहे. मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर यशोशिखर गाठणारी  शारापोव्हाकडून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, यासाठी इयत्ता नववीच्या पाठ्यपुस्तकात शारापोव्हाचा धडा आहे. 

Updated: Jul 29, 2016, 10:18 PM IST
पुस्तकातून वगळणार शारापोव्हाचा धडा title=

पणजी : रशियाची टेनिससुंदरी मारिया शारापोव्हाचा धडा पाठ्य पुस्तकातून वगळला जाणार आहे. मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर यशोशिखर गाठणारी  शारापोव्हाकडून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, यासाठी इयत्ता नववीच्या पाठ्यपुस्तकात शारापोव्हाचा धडा आहे. 

उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणात अडकल्यामुळे शारापोव्हाची प्रतिमा मलीन झाली आहे, त्याचा परिणाम भारताच्या विविध भागातही होत आहे. आता हा धडा वगळण्याचा निर्णय गोवा शालान्त मंडळाने घेतला आहे. 

शारापोव्हाच्या जीवनावर आधारित एक धडा गोव्याच्या नववीतील पुस्तकात समाविष्ट करण्यात आला होता.