नाताल: उरुग्वेच्या लुईस सुआरेझने फिफा विश्व चषकात इटलीच्या चिलीनीच्या खांद्याचा चावा घेतला. या प्रकरणावर सुआरेझवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
सुआरेझने घेतलेला हा चावा साधासुधा नव्हता, कारण चिलीनीच्या खांद्यावर सुआरेझच्या दात उमटले आहेत. सुआरेझवर फुटबॉल सामने खेळण्यासाठी सहा महिने बंदी लागण्याची
शक्यता आहे.
चिलीनी यांची अधिकृत तक्रार केली, त्यांनतर फिफाने सुआरेझ आणि उरुग्वेच्या फुटबॉल असोसिएशनला स्पष्टीकरणाची संधी दिली. सुआरेझला भारतीय वेळेनुसार आज पहाटे दीड
वाजेपर्यंत आपली बाजू मांडायची होती.
सुआरेझवर शिस्तभंगाची कारवाई होणं जवळपास निश्चित आहे, अशी चर्चा आहे. मात्र सुआरेझवर कमीत कमी 6 आणि जास्तीत जास्त 2 वर्षांची बंदी होण्याची शक्यता आहे.
कारण सुआरेझची ही पहिली वेळ नाही, तर प्रतिस्पर्धी खेळाडूंचा चावा घेण्याची ही तिसरी वेळ आहे. उरुग्वेला फार मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण फिफानं सुआरेझवर
बंदीची कारवाई करेल असं म्हटलं जात आहे.
आता सुआरेझवर काय कारवाई होते याकडे त्याच्या चाहत्यांचं लक्षं लागलं आहे. सुआरेझवर कारवाई झाली तर, बाद फेरीत उरुग्वेला सुआरेझशिवायच मैदानात उतरावं लागण्याची शक्यता
आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.