नवी दिल्ली : टी-२० क्रिकेटमध्ये आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला ग्लेन मॅक्सवेलने स्वतःला भाग्यवान म्हटले आहे. आयपीएलमध्ये सेहवाग सारख्या दिग्गज खेळाडूसोबत खेळण्याची संधी मिळाली त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो.
गेल्या वर्षापासून किंग्ज इलेवन पंजाबकडून पहिल्यांदाच खेळणाऱ्या मॅक्सवेलने शानदार कामगिरी करून अनेकांची मनं जिंकली होती. पण यंदा झालेल्या दोन सामन्यात त्याला आपल्या लौकिकाला साजेल असा खेळ करता आलेला नाही.
सध्याच्या फॉर्मबद्दल विचारले असता तो म्हणाला, क्रिकेटमध्ये चढ-उतार येत असतात. तो करिअरचा भाग आहे. मला वाटते मी लवकरच लयमध्ये येईल. इतर काही समस्या होणार नाही. मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या मॅक्सवेलने किंग्ज इलेवन पंजाबकडून खेळण्यास सुरूवात केली.
सेहवाग आणि तेंडुलकर सारख्या खेळाडूंबरोबर आयपीएलच्या माध्यमातून खेळायला मिळाले. मुंबईकड़ून खेळताना मॅक्सवेल तेंडुलकरसोबत खेळला होता. आयपीएल ८ मध्ये मी पुढे पाहणार आहे. सेहवाग सारख्या महान खेळाडूसोबत खेळणे एक चांगला अनुभव आहे. सेहवागशी खेळासंदर्भात नेटमध्ये नियमित चर्चा होती. त्याने मला सांगितले की काहीही झाले तरी आपला नैसर्गिक खेळ सोडू नको. बाहेर होणाऱ्या टीकेकडे लक्ष देऊ नको, असेही सेहवाग नेहमी सांगतो असेही मॅक्सवेलने नमूद केले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.