दुबई : वर्ल्ड टी २०मध्ये शानदार फलंदाजी करणाऱ्या विराट कोहलीने आयसीसी टी२० रँकिंगमध्ये पुन्हा एकदा नंबर वन फलंदाज बनला आहे.
विराटने खेळलेल्या चार सामन्यात १८४ च्या स्टाइक रेटने ९२ च्या सरासरीसह १८४ धावा केल्या. सुपर १०मध्ये सर्वाधिक धावा बनविणारा तो फलंदाज बनला आहे.
या टुर्नामेंटपूर्वी कोहली ऑस्ट्रेलियाचा फलंदाज एरॉन फिन्चपेक्षा २४ अंकांनी मागे होता. आता तो त्याच्यापेक्षा ६८ अंकानी पुढे गेला आहे.
कोहली शिवाय इंग्लंडचा जो रूटने शानदार फलंदाजी केली, त्याचा फायदा त्याला मिळाला आहे. त्याने आतापर्यंत १६८ धावा काढल्या आहेत. त्यामुळे त्याला ३८ स्थानांचा फायदा झाला आहे.
रूट आपल्या करिअरमधील सर्वात श्रेष्ठ ११ व्या रँकिंगवर पोहचला आहे.
न्यूझीलंडची टीम आयसीसीच्या टी-२० रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहचली आह. तर न्यूझीलंड फलंदाज मार्टीन गुप्टीलने तीन सामन्यात १२५ धावा केल्या आहेत. तो आता पाचव्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर गेला आहे.
वेस्ट इंडिजच्या क्रिस गेलने पहिल्या सामन्यात तुफानी शतक केल्याचा फायदा झाला आहे. त्याला एका स्थानाचा फायदा झाला. आता तो आता सहाव्या स्थानावर पोहचला आहे.
वेस्ट इंडिजचा गोलंदाज सॅम्युअल बद्रीने क्रमांक एकचे स्थान पटकावले आहे. चार सामन्यात सहा विकेट घेतल्या आहेत. अश्विनने केवळ चार विकेट घेतल्याने त्याला दोन स्थानांचे नुकसान झाले आहे. तो आता तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे.
ऑलराउंडर रँकिंगमध्ये शेन वॉटसन क्रमांक एक पटकावला आहे. त्याने गेल्या सामन्यात क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने स्पर्धेत ९६ धावा केल्या.