वनडे क्रमवारीमध्ये कोहलीची घसरण

भारताचा कॅप्टन विराट कोहलीची आयसीसीच्या वनडे क्रमवारीत घसरण झाली आहे.

Updated: Jan 28, 2017, 05:06 PM IST
वनडे क्रमवारीमध्ये कोहलीची घसरण  title=

दुबई : भारताचा कॅप्टन विराट कोहलीची आयसीसीच्या वनडे क्रमवारीत घसरण झाली आहे. विराट कोहली आता तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे, तर धोनी मात्र 14व्या क्रमांकावरून 13व्या क्रमांकावर आला आहे.

जखमी असलेला रोहित शर्मा नवव्या स्थानावरून बाराव्या स्थानावर गेला आहे. शिखर धवन आणि इंग्लंडचा जॉस बटलर 14व्या क्रमांकावर आहेत. आयसीसीच्या या क्रमवारीमध्ये भारताचा एकही बॉलर टॉप 10मध्ये नाही. या क्रमवारीमध्ये अक्षर पटेल 12व्या आणि अमित मिश्रा 14व्या क्रमांकावर आहे. वनडेच्या क्रमवारीमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे.

इंग्लंडविरुद्धची सीरिज 2-1नं जिंकल्यानंतरही भारताला फारसा फायदा झाला नाही. ऑस्ट्रेलियाला मात्र पाकिस्तानविरुद्धची सीरिज 4-1नं जिंकल्यामुळे बराच फायदा झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा ओपनर डेव्हिड वॉर्नर आयसीसीच्या क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या 5 मॅचच्या सीरिजमध्ये वॉर्नरनं 367 रन बनवल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.