रीवाची हत्या पूर्वनियोजित नव्हती; पिस्टोरिअसला दिलासा

'अॅथलेटिक्स'च्या जगात 'ब्लेड रनर' नावानं प्रसिद्ध असलेला दक्षिण आफ्रिकेचा धावपटू ऑस्कर पिस्टोरिअस याच्यावर आपल्या गर्लफ्रेंडच्या कट पूर्वनियोजित हत्येच्या कटाचा आरोप सिद्ध होऊ शकलेला नाही.

Updated: Sep 11, 2014, 07:50 PM IST
रीवाची हत्या पूर्वनियोजित नव्हती; पिस्टोरिअसला दिलासा title=

प्रिटोरिया : 'अॅथलेटिक्स'च्या जगात 'ब्लेड रनर' नावानं प्रसिद्ध असलेला दक्षिण आफ्रिकेचा धावपटू ऑस्कर पिस्टोरिअस याच्यावर आपल्या गर्लफ्रेंडच्या कट पूर्वनियोजित हत्येच्या कटाचा आरोप सिद्ध होऊ शकलेला नाही.

न्यायालयानं निर्णय देताना पिस्टोरियसची गर्लफ्रेंड रीवा स्टीनकैंप हिच्या हत्या प्रकरणातील सर्व पुरावे परिस्थितीजन्य आहेत... यातून हे सिद्ध होत नाही की रीवाच्या हत्येचा पिस्टोरिअसनं आधीच कट रचला होता.

विरुद्ध पक्ष ऑस्करवर पूर्वनियोजित हत्येच्या कटाचा आरोप सिद्ध करू शकलेला नाही, असं न्यायालयानं नोंदवलंय. न्यायालय हा निर्णय सुनावत असताना 27 वर्षीय पिस्टोरिअस स्तब्ध होता.  

हा पूर्वनियोजित कट नसून केवळ हत्या प्रकरण असल्यानं पिस्टोरिअसला छोटी शिक्षा मिळू शकते किंवा त्याला तुरुंगातील सुधारगृहातही पाठवलं जाऊ शकतं.  

उल्लेखनीय म्हणजे, घरात कुणीतरी चोर घुसलंय असं वाटल्यानं आपण घाबरून गोळी झाडली होती, असं पिस्टोरिअसनं म्हटलंय. 14 फेब्रुवारी, 2013 रोजी पिस्टोरिअसनं त्याची गर्लफ्रेंड रीवा स्टीनकैंप हिच्यावर गोळी झाडली होती. 

लाखो लोकांच्या जीवनात हार न मानण्याची प्रेरणा देणाऱ्या पिस्टोरिअसनं नकली पायांच्या साहाय्यानं अनेक शर्यती जिंकल्यात. त्याच्या नावावर सहा पॅराऑलिम्पिक गोल्ड मेडल्सची नोंद आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.