MUST WATCH: एका चेंडूवर दोनदा आउट झाला जयवर्धने

एक चेंडू ज्यावर श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज महेला जयवर्धने दोन वेळा आऊट झाला. २०१३-१४ मध्ये यूएईमध्ये श्रीलंकेचा संघ टीम पाकिस्तान विरोधात पहिला टेस्ट खेळत होता. 

Updated: Sep 28, 2014, 07:14 PM IST
MUST WATCH: एका चेंडूवर दोनदा आउट झाला जयवर्धने  title=

नवी दिल्ली : एक चेंडू ज्यावर श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज महेला जयवर्धने दोन वेळा आऊट झाला. २०१३-१४ मध्ये यूएईमध्ये श्रीलंकेचा संघ टीम पाकिस्तान विरोधात पहिला टेस्ट खेळत होता. 

दुसरी विकेट पडल्यावर फलंदाजासाठी आलेल्या जयवर्धने २९ व्या षटकात पाकिस्तानचा जलद गती गोलंदाज बिलावल भट्टी बॅक ऑफ द लेंथ टाकलेल्या चेंडूने बॅटची कड घेऊ विकेटकीपरकडे गेला. जयवर्धने पॅव्हेलियनकडे गेला. पण तेव्हा अंपायरने नो बॉल चेक करण्यासाठी थर्ड अंपायरला कॉल केला. गोलंदाजी पाहून अंपायरने नो बॉल दिला. जयवर्धने पुन्हा क्रिजवर आला.  

पण दुसरा चेंडूवर भट्टीने यॉर्कर चेंडू फेकला पुन्हा चेंडूने बॅटची कडा घेऊन विकटकिपरच्या ग्लोजमध्ये गेला. यावेळी भट्टीने चूक केली नाही. अशा तऱ्हेने जयवर्धने एकाच चेंडूवर दोनवेळा आऊट झाला. 

पाहा याचा व्हिडिओ...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.