हॅमिलटन : वर्ल्डकपच्या पूल बी मधील सामन्यात आयर्लंडने भारतासमोर २६० धावांचं आव्हान ठेवलं आहे.
टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्यासाठी आयर्लँड टीम मैदानात उतरली आणि ४९ षटकात २५९ धावा केल्या. आयर्लंडची संपूर्ण टीम ४९ षटकांत बाद झाली.
टीम इंडियाच्या बॉलर्सना सुरूवातीला हाती यश लागत नव्हतं, पण चौदाव्या षटकात पहिली विकेट घेण्यात यश मिळालं आणि टीम इंडियाच्या बॉलर्सने कोणत्याही बॅटसमनला पिचवर स्थिरावू दिलं नाही.
आयर्लंडचा एन ब्रॉयन ७५, कॅप्टन विल्यम पोर्टरफिल्ड ६७, पॉल स्टर्लिंग ४२, एंडी बालबिर्नी २४ रन्सवर बाद झाला.
भारताकडून मोहम्मद शमीने तीन आणि आर अश्विनने दोन विकेट घेतल्या, सुरेश रैना, रविंद्र जाडेजा, उमेश यादव आणि मोहित शर्माने एक-एक विकेट घेतली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.