दिल्लीचा पंजाबवर ९ विकेटस राखून विजय

दिल्ली डेअरडेविल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात झालेल्या सामन्यात दिल्लीने पंजाबला ९ विकेट्ने पराभूत केल आहे. 

Updated: May 1, 2015, 08:25 PM IST
दिल्लीचा पंजाबवर ९ विकेटस राखून विजय title=

मुंबई: दिल्ली डेअरडेविल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात झालेल्या सामन्यात दिल्लीने पंजाबला ९ विकेट्ने पराभूत केले आहे. 

पहिली फलंदाजी करताना पंजाबने दिल्लीसमोर ११९ धावांचं आव्हान ठेवलं होत. याचा पाठलाग करतांना दिल्लीने हे आव्हान १३.५ षटकांत ९ गडी राखून पूर्ण केलं. दिल्लीकडून श्रेयस अय्यर आणि मयांक अग्रवाल यांनी अर्धशतकं झळकवली. मयांकने ४० चेंडूत ५२ तर श्रेयसने ४० चेंडूत ५४ धावा केल्या. दिल्लीकडून नॅथन कुल्टर-नाईलने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. 

पंजाबकडून डेविड मिलर एकाकी खेळी केली. त्याने ४१ चेंडूत ४२ धावा केल्या. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.