संजय मांजरेकरच्या कमेंट्रीवर भडकला पोलार्ड ट्विटरवर दिले उत्तर

 आयपीएल १० सुरू झाले आणि आता वादांनाही तोंड फुटले आहे.  मुंबई आणि कोलकत्याच्या सामन्यात संजय मांजरेकर याने केलेल्या कमेंट्रीवर किरॉन पोलार्ड चांगलाच भडकला. त्याने थेट ट्विटरवर आपली भडास काढली आणि मांजरेकरला उत्तर दिले. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Apr 10, 2017, 08:48 PM IST
संजय मांजरेकरच्या कमेंट्रीवर भडकला पोलार्ड ट्विटरवर दिले उत्तर  title=

मुंबई :  आयपीएल १० सुरू झाले आणि आता वादांनाही तोंड फुटले आहे.  मुंबई आणि कोलकत्याच्या सामन्यात संजय मांजरेकर याने केलेल्या कमेंट्रीवर किरॉन पोलार्ड चांगलाच भडकला. त्याने थेट ट्विटरवर आपली भडास काढली आणि मांजरेकरला उत्तर दिले. 

कोलकत्याविरूद्ध पोलार्ड फलंदाजीसाी आला तेव्हा संजय मांजरेकर म्हणाला, पोलार्डला वर पाठवले आहे पण, त्याला वर खेळण्याची समज नाही. तो फक्त शेवटच्या सहा ओव्हरमध्ये चांगली फलंदाजी करू शकतो. 

 

कमेंट्री दरम्यान मांजरेकरच्या या टिप्पणीवर पोलार्ड भडकला, ट्विटरवर तो म्हणाला, तुला जे वाटते की तू जे काही बोलतो ते योग्य आहे, कारण तुला बोलायचे पैसे मिळतात. तू आपली बडबड सुरू ठेवू शकतो.  त्यानंतर पोलार्डने आणखी एक ट्विट लिहिले, की  तुला माहिती का मी इतका मोठा कसा झालो... मुर्खपणामुळे.. शब्द खूप ताकदीचे असता एकदा तोंडातून निघाले ते परत घेता येत नाही.