नवी दिल्ली : शनिवारी सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात लायन्स यांच्यातील एक दृश्य पाहून कोणालाही गल्ली क्रिकेटची आठवण येईल. खेळताना आपण कशी एकमेंकांची मदत करत होतो.
असे काहीसे घडले हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नर आणि गुजरातचा गोलंदाज बासिल थंपी यांच्यात... शनिवारी गुजरात लायन्स आणि सनराइजर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगला. डेविड वॉर्नर नॉन स्ट्राइकिंग एन्डवर होता. चेंडू होता बेसिल थंपी याच्या हातात बॅटिंग करत होता हॅनरिकेस... थंपीने चेंडू टाकल्यावर हॅनरिकेसने समोर चेंडू टोलावला.
थंपीने हा चेंडू अडविण्याचा प्रयत्न केला पण फॉलो-थ्रू करताना तो पडला आणि त्याचा एक बूट पायातून निघाला. तिकडे वॉर्नर रन घेण्यासाठी धावत होता. त्यावळी रस्त्यात त्याला बूट पडलेला दिसला, वॉर्नरने हा बूट उचलला आणि झटपट थंपीकडे सोपवला आणि आपला रन पूर्ण केला...
हे दृश्य पाहून स्टेडिअममध्ये वॉर्नरचे कौतुक झाले, तर सपोर्ट स्टाफ आणि कोच यांना हसू आले.