नवी दिल्ली : आयपीएलमध्ये असं काही नाही जे शक्य नाही. टी-२० फॉर्मेटमध्ये प्रत्येक सामन्यात नवीन कारनामा होतो. अशी अद्भूत कामगिरी कोलकता नाइटराइडर्सच्या मनीष पांडेने केला आहे.
मनीष पांडेने मुंबई इंडियन्सविरूद्ध खेळताना ४७ चेंडूत ८१ धावांची खेळी केली. पांडेने आपल्या खेळीत ५ चौकार आणि ५ षटकार लगावले.
मनीषने केकेआरकडून तुफान फटकेबाजी करताना मॅक्लेगनच्या अखेरच्या षटकात २१ धावा कुटल्या. त्यात १८ धावा दोन चेंडूत काढल्या.
पहिला चेंडू - मनीष पांडेने लगावला षटकार
दुसरा चेंडू - नो बॉल होता आणि त्यावर चौकार लगावला.
दुसरा चेंडू (पुन्हा) - त्यावर वाइड बॉल टाकला.
दुसरा चेंडू ( पुन्हा ) - या चेंडूवर मनीष पांडेने षटकार लगावला.
त्यामुळे ६,५,१,६ असे एकूण १८ धावा काढल्या. त्यात एक - एक वाइड आणि नो बॉल होता आणि पांडेने २ षटकार आणि एक चौकारसह १६ धावा काढल्या...