सिंगापूर : सिंगापूरमध्ये सुरु असलेल्या 'राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धे'त पहिल्याच दिवशी महाराष्ट्राच्या दोन महिला कुस्तीगिरांनी देशाच्या खात्यात दोन पदके मिळवून दिली.
कोल्हापूरची कुस्तीपटू रेश्मा माने हिने ६३ किलो वजनी गटात सिंगापूरच्या चरमायनी हुगीटिव्हना हिचा पराभव केला. तर भारताच्याच गार्गी यादवला पराभूत करून सुवर्णपदक पटकावलं.
तर मुळची बीडची असलेल्या कुस्तीपटू सोनाली तोडकर हिने ५८ किलो वजनी गटात ऑस्ट्रेलियन महिला मल्लावर विजय मिळवला. मात्र, सोनाली तोडकराला अंतिम स्पर्धेत भारताच्या मंजुकडून पराभव स्विकारावा लागल्यानं तिला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं.