झिम्बाब्वे दौऱ्यावरील टीम इंडियाच्या सदस्याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक?

 झिम्बाब्वे दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाच्या सदस्यावर एका महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक कऱण्यात आल्याचे वृत्त आहे. 

Updated: Jun 19, 2016, 01:46 PM IST
झिम्बाब्वे दौऱ्यावरील टीम इंडियाच्या सदस्याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक? title=

हरारे :   झिम्बाब्वे दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाच्या सदस्यावर एका महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक कऱण्यात आल्याचे वृत्त आहे. हरारेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त चॅरिटी चारांबा यांनी या वृत्ताला दुजोरा दिलाय. ही घटना मायकलेस हॉटेलमध्ये घडलीये जिथे टीम इंडिया उतरली आहे.

हॉटेलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला हॉटेलच्या लॉबीमध्ये फिरत होती. त्यावेळी हे घडलं. पीडित महिलेने टीम इंडियाच्या एका सदस्याच्या विरोधात तक्रार दाखल केलीये. आता अधिक काही सांगू शकत नाही, अशी माहिती चारांबा यांनी दिली. 

पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, तिला ड्रग्ज देण्यात आले. जेव्हा तिला जाग आली तेव्हा ती एका टीम इंडियाच्या सदस्याच्या रुममध्ये होती. तिला माहित नाही की ती रुममध्ये कशी पोहोचली?

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरु आहे.