निर्भेळ यशासाठी भारतीय संघ सज्ज

कानपूर आणि कोलकाता कसोटीमध्ये दमदार विजय मिळवल्यानंतर होळकर स्टेडियममध्ये निर्भेळ यश मिळवण्यासाठी भारतीय संघ सज्ज झालाय. 

Updated: Oct 8, 2016, 07:54 AM IST
निर्भेळ यशासाठी भारतीय संघ सज्ज title=

इंदूर : कानपूर आणि कोलकाता कसोटीमध्ये दमदार विजय मिळवल्यानंतर होळकर स्टेडियममध्ये निर्भेळ यश मिळवण्यासाठी भारतीय संघ सज्ज झालाय. 

तीन सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने जिंकत भारताने मालिकेत विजयी आघाडी घेतलीये. त्यामुळे तिसरा सामना जिंकत 3-0ने मालिका जिंकण्याच्या इराद्याने आज भारतीय संघ मैदानात उतरेल.

दुसऱ्या कसोटी सामन्यात दमदार कामगिरी करणाऱा भुवनेश्वर कुमार दुखापतीमुळे खेळू शकणार नाही. त्यामुळे आर. अश्विन, मोहम्मद शामीवरील गोलंदाजीची जबाबदारी अधिक वाढणार आहे. 

दुसरीकडे तब्बल दोन वर्षांनी गौतम गंभीरला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सलामीला कोणती जोडी उतरणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल.