बंगळुरू : टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरी टेस्ट उद्यापासून बंगळुरुमध्ये सुरुवात होतेय.. याआधी दोन्ही टीम्सनी बंगळुरुच्या मैदानात चांगलाच घाम गाळलाय..
मोहालीतल्या विजयामुळं विराट सेनेचा आत्मविश्वास चांगलाच दुणावलाय.. बॉलर्सच्या कामगिरीमुळं विजय साकार झाला असला तरी बॅट्समन्सच्या कामगिरीची चिंता भारतीय टीमपुढं आहे...
मोहाली टेस्टमध्ये टीम इंडियाच्या फिरकीनं आफ्रिकन बॅट्समन्सला चांगलंच नाचवलं होतं.. त्यामुळं दुस-या टेस्टमध्ये अश्विन, जाडेजा आणि मिश्रा या भारतीय स्पिनर्सचा सामना कसा करायचा असा प्रश्न आफ्रिकन बॅट्समनपुढं आहे..
या टेस्टआधी आफ्रिकेच्या टीमला दोन मोठे धक्के बसलेत.. फास्ट बॉलर डेल स्टेन आणि वर्नेन फिलेंडर या टेस्टमधून आऊट झालेत.. त्यामुळं दक्षिण आफ्रिकन टीमची डोकेदुखी चांगलीच वाढलीय...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.