SCORE : भारताकडे भक्कम आघाडी

फिरोजशहा कोटला स्टेडियमवर सुरु असलेल्या चौथ्या कसोटीतील दुसऱ्या डावात भारताने ४०३ धावांची मजबूत आघाडी घेतलीये. 

Updated: Dec 5, 2015, 05:32 PM IST
SCORE : भारताकडे भक्कम आघाडी title=

नवी दिल्ली : फिरोजशहा कोटला स्टेडियमवर सुरु असलेल्या चौथ्या कसोटीतील दुसऱ्या डावात भारताने ४०३ धावांची मजबूत आघाडी घेतलीये. तिसऱ्या दिवसअखेर भारताने दुसऱ्या डावात ४ बाद १९० धावा केल्या.

तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा विराट कोहली ८३ आणि अजिंक्य रहाणे ५२ धावांवर खेळत होते. पहिले चार गडी ५७ धावांवर गमावल्यानंतर विराट आणि अजिंक्यने संयमी खेळी करताना पाचव्या विकेटसाठी १५५ धावांची नाबाद भागीदारी  केली. सलामीवीर मुरली विजय आणि रोहित शर्मा झटपट बाद झाले. त्यानंतर शिखर धवन आणि चेतेश्वर पुजारालाही जास्त काळ खेळपट्टीवर तग धरता आला नाही. चार फलंदाज अवघ्या ५७ धावांवर तंबूत परतले असता विराट आणि अजिंक्यने खेळपट्टीवर तग धरला आणि संघाला मोठी आघाडी मिळवून दिली. 

तत्पूर्वी, दुसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव ३३४ धावांवर संपुष्टात आल्यानंतर प्रत्युत्तरादाखल आफ्रिकेला पहिल्या डावात केवळ १२१ धावा करता आल्या. भारताच्या फिरकी माऱ्यापुढे आफ्रिकेच्या फलंदाजांनी सपशेल नांगी टाकल्याने त्यांना मोठी धावसंख्या रचण्यात अपयश आले. यामुळे भारताने २१३ धावांची आघाडी घेतली. 

दुसऱ्या दिवसाच्या खेळावर भारताच्या क्रिकेटपटूंनी अष्टपैलू कामगिरी केली. अजिंक्य रहाणेची संयमी खेळी आणि अश्विनचे अर्धशतक यामुळे भारताने तीनशेपार धावांचा आकडा गाठला. त्यानंतर रविंद्र जडेजा आणि इतर गोलंदाजांनी आफ्रिकेची पिसे काढली. जडेजाने पाच विकेट घेताना पाहुण्यांना झटपट बाद केले. 

पाहा लाईव्ह स्कोरकार्ड

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.