इंग्लंडचा पहिला डाव 477 धावांवर संपुष्टात

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटीत इंग्लंडने पहिल्या डावात 477 धावांचा डोंगर उभारलाय. 

Updated: Dec 17, 2016, 03:04 PM IST
इंग्लंडचा पहिला डाव 477 धावांवर संपुष्टात title=

चेन्नई : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटीत इंग्लंडने पहिल्या डावात 477 धावांचा डोंगर उभारलाय. 

मोईन अलीच्या सर्वाधिक 146 धावा, ज्यो रुट 88, लियाम डॉसन 66 आणि अदिल रशीदच्या 60 धावांच्या जोरावर इंग्लडने पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारलीये. 

भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तर उमेश यादव आणि इशांत शर्मा यांना प्रत्येकी दोन विकेट मिळवता आल्या.