दिल्ली : भारतीय संघाची न्यूझीलंडविरुद्धची विजयाची मालिका अखेर संपली आहे. दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताचा सहा रननं पराभव झाला आहे. भारताचा 236 रनवर ऑलआऊट झाला आहे.
243 रनचा पाठलाग करताना सुरवातीपासूनच भारताच्या विकेट पडत गेल्या. भारताच्या एकाही बॅट्समनला या मॅचमध्ये हाफ सेंच्युरी मारता आली नाही. पहिल्या चार विकेट पडल्यानंतर धोनी आणि केदार जाधवनं भारताला सावरण्याचा प्रयत्न केला पण धोनी 39 रनवर तर केदार जाधव 41 रनवर आऊट झाला. त्यानंतर हार्दिक पांड्यानं 36 रनची अयशस्वी झुंज दिली. न्यूझीलंडकडून टीम साऊदीनं सर्वाधिक 3 विकेट घेतल्या.
याआधी धोनीनं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. न्यूझीलंडचा कॅप्टन केन विलियमसननं शानदार सेंच्युरी लगावली. विलियमसनच्या 118 रनच्या खेळीमध्ये 14 फोर आणि 1 सिक्सचा समावेश होता. भारताकडून जसप्रीत बुमराह आणि अमित मिश्रानं प्रत्येकी तीन विकेट घेतल्या तर उमेश यादव, अक्सर पटेल आणि केदार जाधवला प्रत्येकी एक विकेट मिळवण्यात यश आलं.