अॅडिलेड : जलद गोलंदाज वरूण एरॉनच्या चार विकेटच्या मदतीने भारताने दोन दिवसीय दुसऱ्या सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलिया इलेवनला २४३ धावांवर गुंडाळले. फिल ह्युजेसच्या निधनानंतर एका आठवड्यानंतर आज दोन्ही संघ मैदानात उतरले.
पहिल्या दिवसाचा खेळ समाप्त होईपर्यंत भारताने दोन विकेटच्या बदल्यात ९९ धावा बनविल्या होत्या. सलामीचा फलंदाज मुरली विजय ३९ आणि कार्यवाहक कर्णधार विराट कोहली ३० धावा बनवून खेळत आहेत.
ह्युजेसच्या निधनानंतर दुःखातून सावरत आज सराव सामन्याच्या माध्यमातून दोन्ही संघत मैदानात उतरले. या सामन्याला अधिकृत दर्जा नाही त्यामुळे भारतीय खेळाडूंना टॉस न करता क्षेत्ररक्षण निवडण्याची परवानगी देण्यात आली. दोन दिवसात दोन्ही संघ १०० षटके खेळतील.
क्षेत्ररक्षण करताना संघाचा कर्णधार असताना ईशांत शर्माने गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे कोहली आणि रोहित शर्माला आराम मिळू शकला. हे दोघे मॅक्सविले येथून ह्युजेसच्या अंत्यसंस्काराला गेले होते. नियमित कर्णधार महेंद्रसिंग धोनी शनिवारपासून संघात समील होणार आहे.
ह्युजेससाठी सामन्यापूर्वी एक मिनिटाचे मौन ठेवण्यात आले. भारतीय खेळाडूंनी काळ्या रंगाच्या फिती बांधल्या होत्या. तसेच स्कोअरबोर्डवर आरआयपी पी. ह्युजेस ४०८' असे लिहिले होते. भारताचा सर्वात जलद गती गोलंदाज एरॉनने १४.३ ओव्हरमध्ये ४१ धावा देऊन ४ विकेट घेतल्या. त्याने पहिल्या सराव सामन्यात ३ विकेट घेतल्या. मोहम्मद शमी याने १२ ओव्हर्समध्ये ३७ धावा देऊन २ विकेट घेतल्या. लेग स्पीनर कर्ण शर्मा याने १३ ओव्हर्समध्ये ५७ धावा देऊन ३ विकेट घेतल्या. जलद गोलंदाजांनी दोन विकेट केवळ सहा धावांमध्ये उखाडल्या. तिसरी विकेट ३४ धावांवर गेली. उमेश यादव आणि इशांतला एकही विकेट मिळाली नाही. आर. अश्विन आणि भुवनेश्वरला आराम देण्यात आला होता.
ऑस्ट्रेलियाकडून जॉर्डन सिल्क आणि विकेटकीपर सेब गोच ५८-५८ धावा बनविल्या. सिल्कला एरॉनने बाद केल्यानंतर विकेट ठराविक अंतराने पडल्या.
एकावेळी ऑस्ट्रेलिया इलेवनच्या सात विकेट १५९ धावांवर पडल्या. पण गोचने दुसरी बाजू सांभाळत ऑस्ट्रेलियाचा स्कोअर २०० वर नेला.
भारतीय संघाची सुरूवातही खराब झाली. शिखर धवन खराब शॉट खेळून शॉर्ट लेगवर कॅच दिला. विजय आणि पुजारा यांना इनिंगमध्ये एक एक जीवनदान मिळाले. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ३५ धावा केल्या.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.