हॉकीमध्ये भारतानं पाकिस्तानला चारली धूळ

हॉकीच्या मैदानावर भारतीय संघानं पाकिस्तानला पुन्हा एकदा धूळ चारली आहे.

Updated: Oct 23, 2016, 07:15 PM IST
हॉकीमध्ये भारतानं पाकिस्तानला चारली धूळ title=

कुआनटन : हॉकीच्या मैदानावर भारतीय संघानं पाकिस्तानला पुन्हा एकदा धूळ चारली आहे. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत झालेल्या अटीतटीच्या लढतीत भारतानं पाकिस्तानवर 3-2नं मात केली आहे.

भारताकडून प्रदीप मोर, रुपिंदर पाल सिंग आणि रमणदीप सिंग यांनी प्रत्येकी एक गोल करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. चुरशीच्या झालेल्या या लढतीत प्रदीप मोर यानं 22व्या मिनिटाल गोल करुन भारताला 1-0नं आघाडी मिळवून दिली. ब्रेकपूर्वी भारत-1-0नं आघाडीवर होता, मात्र ब्रेकनंतर मोहम्मद रिझवान आणि मोहम्मद इरफान यांनी प्रत्येकी एक गोल करत पाकिस्तानला आघाडीवर नेलं.

सामनच्या अखेरीस रुपिंदर सिंग आणि रमणदीप सिंग यांनी प्रत्येकी एक गोल करत भाताला 3-2 अशा आघाडीसह विजयश्री खेचून आणला. भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पहिल्याच सामन्यात जपानला 10-2 असे पराभूत करत विजयी सलामी दिली. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात कोरियासोबत भारताला 1-1 अशी बरोबरी स्वीकारावी लागली.