इंचियोन : जगभरात धूम उडवून देणाऱ्या ‘गंगनम स्टाईल’नं १७ व्या ‘एशियन गेम्स’ची सुरुवात झालीय. यामध्ये ४५ देशांच्या १३,००० हून अधिक खेळाडुंनी सहभाग घेतलाय.
यावेळी, रंगारंग आतिशबाजी आणि व्हिज्युअल इफेक्ट या कार्यक्रमाचं आकर्षण ठरले. कोरियन राष्ट्रपती पाक गेयुन हाइ यांनी खचाखच भरलेल्या मुख्य स्टेडियममध्ये टाळ्यांचा गजरात खेळांच्या उद्घाटनाची घोषणा केली. त्यानंतर सगळं आसमंत आतिषबाजीनं उजळून निघालं.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही खेळाडूंना शुभेच्छा दिल्यात. शुक्रवारी, साऊथ कोरियातल्या इंचियोन शहरात एशियन गेम्स उद्घाटनाचा शानदार सोहळा पार पडला. हॉकी संघाचे कॅप्तन सरदार सिंह यांनी भारतीय संघाचं नेतृत्व केलं. भारतीय पुरुष खेळाडुंनी काळा ब्लेझर आणि महिलांनी निळ्या रंगाची साडी परिधान केली होती. सगळ्याच खेळाडुंच्या हातात तिरंगा आणि चेहऱ्यावर स्मित दिसत होतं. भारतानं यामध्ये तब्बल २८ खेळांमध्ये सहभाग घेतलाय तर जवळपास ७०० सदस्यांचं दल इथं उपस्थित झालंय.
दोन आठवडे चालणाऱ्या या खेळांच्या महाकुंभाची सुरुवात अग्निकुंड प्रज्वलित करून करण्यात आलं. कोरियन अभिनेत्री ली यंग आइ हिनं अग्नि प्रज्वलित केला.
परंपरेनुसार एशियन गेम्सची मशाल यजमान देशातच प्रज्ज्वलित केली जाते. परंतु, एशियन गेम्सच्या इतिहासाला सन्मा देत १७ व्या एशियन गेम्सची मशाल पहिल्यांदाच दुसऱ्या देशात पेटवली गेली... हा मान भारतानं मिळवला. ९ ऑगस्ट रोजी नवी दिल्लीच्या ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियमवर ही मशाल पेटवली गेली होती. इथंच १९५१ मध्ये पहिल्या एशियन गेम्सचं आयोजन करण्यात आलं होतं. यामुळे, आता एक नवी परंपरा सुरु झालीय... आता ही मशाल ध्यनचंद स्टेडियममध्येच पेटविण्यात येईल. मशाल नवी दिल्लीहून चीनच्या समुद्री मार्गानं १२ ऑगस्ट रोजी इंचियोन पोहचली होती.
या समारंभाचा समारोप गंगनम स्टाईलच्या संगीतानं आणि नृत्यानं करण्यात आला. यावेळी खेळाडुंनी आणि प्रेक्षकांनीही भरपूर आनंद लुटला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.