तुमचे नाव सिंधू आहे तर तुम्हाला मिळणार फ्री पिझ्झा

रिओ ऑलिम्पिकमध्ये जबरदस्त कामगिरी करत बॅडमिंटनमध्ये रौप्य पदक जिंकणारी पी.व्ही.सिंधूवर बक्षिसांचा वर्षाव केला जातोय. 

Updated: Aug 20, 2016, 07:02 PM IST
तुमचे नाव सिंधू आहे तर तुम्हाला मिळणार फ्री पिझ्झा title=

नवी दिल्ली : रिओ ऑलिम्पिकमध्ये जबरदस्त कामगिरी करत बॅडमिंटनमध्ये रौप्य पदक जिंकणारी पी.व्ही.सिंधूवर बक्षिसांचा वर्षाव केला जातोय. 

त्यातच आता पिझ्झाहटनेही सिंधूच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी सिंधू नावाच्या महिलांना फ्रीमध्ये पिझ्झा देण्याची ऑफर सुरु केलीये. जर तुमचे नाव सिंधू आहे तर तुम्हालाही फ्रीमध्ये पिझ्झा मिळू शकतो. 

पिझ्झा हटने याआधीही रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावणाऱ्या साक्षी मलिकच्या नावानेही ही ऑफर सुरु केली होती. या ऑफर्सचा अनेक महिलांनी फायदा उचलला.